Ads

-

अरे देवा, श्रीरामाच्या दानपेटीवरही डल्ला.

By Xtralarge News

June 17, 2026 5:46 pm

Ads

अरे देवा, श्रीरामाच्या दानपेटीवरही डल्ला.

सांगली, दि. १७ जून २६:-

अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर हे करोडो भारतीयांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. पण याच केंद्रात सामान्य भक्तांच्या श्रद्धेची थट्टा केली जात आहे. कारण सामान्य भक्तांनी मोठ्या श्रद्धेने दिलेल्या दानातील जवळपास २०० कोटी लंपास केले गेले आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या चरणी अर्पण केलेले दान नेमके कुठे गेले, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. लाखो भक्तांनी आस्थेने दिलेला निधी जर देवापर्यंत पोहोचत नसेल, तर हा केवळ आर्थिक घोटाळा नसून भक्तांच्या श्रद्धेची फसवणूक आहे.

पुढे ते म्हणाले की, अशाचप्रकारे महाराष्ट्रातील अनेक हिंदू देवस्थानांच्या जमिनी बेकायदेशीरपणे हडप करण्यात आल्या आहेत. या जमिनीच्या चोरीला संरक्षण देणारा कायदा आणण्यापूर्वी त्या जमिनी मूळ देवस्थानांना परत मिळाल्या पाहिजेत, हीच न्याय्य भूमिका आहे तसेच धर्म, देव आणि श्रद्धा ही राजकारणाची साधने नसून समाजाच्या विश्वासाचा पाया आहेत. त्यामुळे किमान देवाच्या दरबारात तरी संपूर्ण पारदर्शकता असली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment