Ads

-

अयोध्येच्या राम मंदिरात २०० कोटींचा घोटाळा!

By Xtralarge News

June 16, 2026 1:12 pm

Ads

अयोध्येच्या राम मंदिरात २०० कोटींचा घोटाळा!

अयोध्या, दि. १६ जून २०२६..

अयोध्यापती प्रभू राम मंदिरात भाविकांनी दान केलेले, देणग्या दिलेल्या पैशांमध्ये मोठा घोटाळ्याची चर्चा आहे. हिशोबात नसलेल्या देणग्यामध्ये मोठा अपहार करण्यात आला असून ही रक्कम २०० कोटी रुपये असल्याचे समजते. रोख देणग्यांव्यतिरिक्त भाविकांनी अर्पण केलेले दागिनेही गायब झाले आहेत, यामध्ये कोट्यवधी रुपये किमतीच्या सोने-चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे. तसेच, सोन्याची दोन किलो वजनाची गदाही गायब झाल्याची चर्चा आहे.

राम मंदिरातील घोटाळ्याची माहिती समोर येताच सरकारने या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक एसआयटी ची स्थापना केली आहे. पण ज्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे त्या आपल्या पदांवर कायम असताना ‘एसआयटी’ (SIT) निष्पक्ष तपास करू शकेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राम मंदिरात अर्पण केलेल्या देणग्यांच्या अफरातफरीचे प्रमाण निश्चित करणे सोपे नाही.श्री राम मंदिर ट्रस्टच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर आर्थिक अनियमितता आणि देणगीच्या रकमेचा अपहार केल्याचे आरोप असल्याने त्यांची चौकशी केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment