मोदी देशाला पुन्हा गुलाम बनवत आहेत..
मुंबई, दि. १५ जून २६ :
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत टोकदार शब्दांत हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका X पोस्ट (ट्विट) मधून आंबेडकर यांनी अमेरिकेतील घटनांवर भारत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोदींना थेट लक्ष्य केले.
आंबेडकर म्हणाले की, “कोणत्याही स्वाभिमानी देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या तीन नागरिकांच्या मृत्यूबाबत अमेरिकेकडे जाब विचारला असता, अमेरिकेला जबाबदार धरले असते आणि कठोर पावले उचलली असती. मात्र नरेंद्र मोदी तसे करत नाहीत.”
मोदींवर अधिक टीका करताना त्यांनी म्हटले की, “मोदी हे संकटाच्या वेळी बिळात लपणाऱ्या उंदरासारखे वागतात. अन्यथा ते परदेश दौऱ्यांवर जाऊन टॉफी-चॉकलेट वाटण्यात व्यस्त असतात.” अमेरिकेबाबत भारत सरकारची भूमिका अत्यंत लाचार असल्याचा आरोप करत आंबेडकर म्हणाले, “मोदी अमेरिकेच्या तालावर मुजरा करत आहेत. त्यांच्या धोरणांमुळे भारत पुन्हा एकदा गुलाम देश बनत आहे.”
या वक्तव्यात आंबेडकर यांनी मोदींना उद्देशून वारंवार “मोदी एक चूहा हैं” अशी टीका केली असून, त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. आंबेडकर यांच्या या विधानावर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
Leave a Comment