उद्धव ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का..
नवी दिल्ली, दि. १७ जून २६.
उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला असून सहा खासदारांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.या सहा खासदारांमध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांचा समावेश आहे.शिवसेना (यूबीटी) कडे आता नऊ लोकसभा खासदारांपैकी केवळ अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे तीन खासदाराच बरोबर राहिले आहेत.
दिल्लीतील पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत बंडखोर खासदारांना उद्देशून म्हणाले की, “खासदारांच्या विजयासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना (यूबीटी) च्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. जर तुम्हाला पक्ष बदलायचा असेल, तर आधी राजीनामा द्या. या खासदारांना १५ कोटी रुपयांना विकत घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तृणमूल काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांसारखे पक्ष जर फोडले जात असतील, तर निवडणुका लढवण्यात काहीच अर्थ नाही, असेही संजय राऊत म्हणाले.
ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरेंच्या खासदारांना गळ टाकण्यात आला व ६ जण त्यात अडकले. या ऑपरेशनमागे एक महाशक्ती असून त्यांच्याच पाठिंब्याने हे ऑपरेशन पार पडल्याचे समजते. या बंडखोर खासदारांसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली होती. दिल्लीत जाऊन या सहा खासदारांनी वेगळे होत असल्याचे पत्र लोकसभेच्या अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिले आह तर आमची बाजू आधी ऐकून घ्या व नंतरच निर्णय घ्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून करण्यात आली आहे.
Leave a Comment