रंग बदलने वालोंको हम बाद मे देखेंगे..
रंग बदलने वालोंको हम बाद मे देखेंगे..
सांगली, दि. १ डिसेंबर २०२५ ;
उरुण ईश्वरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव यांनी लोकांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंद मलगुंडे यांच्या विजयाची तुतारी वाजवण्यासाठी जनता सज्ज झाली आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
जयंतराव पाटील आपल्या भाषणात म्हणाले की, २०१६ पर्यंत आपल्या शहराचा विकास चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत होता. त्यानंतर मात्र ग्रहण लागलं. गेल्या नऊ वर्षात झालेली शहराची अधोगती भरून निघावी ही आता लोकांची अपेक्षा आहे. त्यासाठी ते आपल्या पक्षाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही जमिनीला धरून राहणारी माणसं आहोत, त्यामुळे गल्लीबोळात फिरून लोकांमध्ये राहणं, त्यांचे प्रश्न जाणून घेणं हा आमचा स्वभाव आहे. आणि सत्ता नसताना देखील सरकारकडून पैसे कसे आणण्याचे हे मला चांगलं ठाऊक आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या शहरात अडीच हजार बेघरांना घरकुल मिळणे अपेक्षित होते, मात्र प्रत्यक्षात फक्त सहाशे घरांना निधी मिळाला. जर आमची सत्ता असती तर ही तफावत राहिली नसती. पण यांचे लक्षच नाही, त्यामुळे हा महत्वाचा विषय मागे पडला तसेच आपली सत्ता आली की आधी भुयारी गटार आणि सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट पूर्ण करू, रस्त्यावरील ट्रॅफिक्सचे नियोजन करू असे त्यांनी आश्वाशीत केले.
शास्तीकरावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सहकाऱ्यांचे एकाप्रकारे कानच तुचले आहे. ते म्हणाले की शसतीकर कमी करण्यासाठी तुम्ही आधीच माझ्याकडे यायला हवे होते. तरी मुख्यमंत्र्यांनी आश्वाशीत केले आहे की उरण ईश्वरपूरचा शसतीकर कमी करणार. याचेही श्रेय आम्हालाच जाते कारण शसतीकर कमी करण्याची मागणी सर्वात आधी आपणच केली होती असे जयंतराव पाटील म्हणाले.
शामराव अण्णा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे शहर सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केले आहे. त्यांच्या विचारांचे वाटेवर जाऊन आम्ही नगर परिषदेमार्फत दरवर्षी उरुण ईश्वरपूर महोत्सव साजरा करू. कलेला व्यासपीठ निर्माण करून देऊ. आपल्या खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी खाऊगल्ली सुरू करू. मोफत मंगल कार्यालय सुरू करू. दहा हजार झाडं दरवर्षी लावून ती जगवण्याचा निर्धार करू. बचतगटाच्या महिला भगिनींना विना तारण १० लाख रुपयांचे कर्ज देण्याचा, त्यांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न राहील. घरांवरचा शास्ती कर रद्द करू. भविष्याच्या दिशेने वाटचाल करताना, नवीन तंत्रज्ञान या शहराकडे आणण्याच्या आमचा प्रयत्न राहील असे त्यांनी सांगितले.
*अभी हमारा ध्यान वक्त बदलने पर हैं*
*रंग बदलने वालोंको हम बाद मे देखंगे*
अशी शायरी करत जयंतराव पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणाऱ्यांना इशारा दिला आहे.
