Ads

-

ST मध्ये कंत्राटी चालक भरती?

By Xtralarge News

November 27, 2025 9:05 pm

Ads

ST मध्ये कंत्राटी चालक भरती?

मुंबई, दिनांक २७ नोव्हेंबर ;

राज्य सरकार एसटीला स्व मालकीच्या ८००० नव्या गाड्या खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असून प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.हा निर्णय प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत चांगला व दिलासा देणारा असला तरी त्याला लागणारे चालक मात्र कायमस्वरूपी देण्यास सरकारने असमर्थता दर्शविली असून या गाड्यांवर कंत्राटी चालक नेमले जाणार आहेत अशी माहीती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

ST च्या ताफ्यात येत्या सहा महिन्यात नवीन ८००० गाड्या येणार असून प्रवाशांच्या दृष्टीचे हा अत्यंत चांगला व महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. या निर्णयामुळे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून बऱ्याच वर्षांनी एसटीच्या ताफ्यात मोठ्या प्रमाणावर गाड्या येत असल्याने अनधिकृत खाजगी वाहतुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल अशी शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे.

एवढ्या मोठ्या संख्येने स्व मालकीच्या गाड्या बऱ्याच वर्षांनी एसटीच्या ताफ्यात येत असून त्यावर चालक मात्र कंत्राटी पद्धतीने नेमले जाणार आहेत. हे कंत्राट तीन वर्षासाठी असून गाड्यांचे आयुर्मान मात्र १५ वर्ष असणार आहे. याशिवाय निर्धारित १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व किलोमीटर संपल्यावर या गाड्या LNG मध्ये रूपांतरित होणार असून सद्या चालकांना इतरत्र मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या असल्याने तीन वर्षाचे कंत्राट संपल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात चालक मिळतील का? अशी शंका उपस्थित होत आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या घेतल्यानंतर त्यावर पुढे चालक मिळणे मुश्किल वाटते.त्यामुळे कंत्राटी पद्धतीने चालक नेमल्यास व पुढे त्यात सातत्य राखण्यात अपयश आल्यास भविष्यात अनेक संकटाना सामोरे जावे लागणार असल्याचा दावा या क्षेत्रातील जाणकार करीत असून राज्य सरकारने एसटीला कायम स्वरूपी चालक भरती करण्यास मंजुरी दिली तर कायम स्वरूपी रोजगार निर्मिती होईल व त्यातून अनेक प्रश्न सुटतील असेही बरगे यांनी म्हटले आहे.

No comments to show.

Leave a Comment