धाराशिवमधील NCP चा मोठा नेता काँग्रेसमध्ये ..

0
IMG-20251111-WA0180

धाराशिवमधील NCP चा मोठा नेता काँग्रेसमध्ये ….

मुंबई, दि. ११ नोव्हेंबर :

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे धाराशीव जिल्ह्यातील नेते अशोक भाऊ जगदाळे यांच्यासह असंख्य नेते व पदाधिकारी यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला..

अशोक जगदाळे यांच्याबरोबर नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष नितीन कासार, माजी उपनगराध्यक्ष शरिफ भाई शेख, माजी नगरसेवक अमृत भाऊ पुदाले, माजी नगरसेविका सुमनताई जाधव, संजय बेडगे, ताजोद्दीन सय्यद, रुक्नोदीन शेख, आलीम शेख, दत्ता राठोड, अमोल सुरवसे, नवलकुमार जाधव, माजी नगराध्यक्षा रेखाताई वसंत बागल यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

सर्वांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, काँग्रेस पक्ष सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष असून काँग्रेसचा विचार देशाला तारणारा आहे. काँग्रेसचा विचार व राहुल गांधी यांचा संघर्ष यावरचा विश्वास दृढ होत असून काँग्रेस पक्षाला राज्यात पुन्हा चांगले दिवस येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *