महायुतीत जागा वाटपाबाबत मतभेद नाहीत..
महायुतीत जागा वाटपाबाबत मतभेद नाहीत..
पुणे, ता, १० नोव्हेंबर :
महायुतीमध्ये जागा वाटपावर कोणतेही भांडण नाही. आमचा एकच अजेंडा आहे. तो म्हणजे महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्रातील जनतेला विकासाच्या मार्गावर नेणे,” असं स्पष्ट करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, महायुतीतील सर्व घटक एकदिलाने काम करत आहेत असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले…
शिंदे म्हणाले, “हिंदुत्वाची विचारधारा आमची समान आहे. आमचे रंग भगवे आहेत. त्यामुळे आम्ही राजकारणासाठी नव्हे, तर विचारधारेसाठी एकत्र आलो आहोत. शिवसेना आणि पतित पावन संघटनेचे विचार एकसारखे असून, दोन्ही संघटना एकत्र आल्याने भगवा अजून बळकट होणार आहे.”
ते पुढे म्हणाले, “शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेवर चालणारी पक्षसंस्था आहे, तर पतित पावन संघटना देखील त्याच भूमिकेतून कार्य करते. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये महायुतीचाच भगवा फडकेल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच स्थानिक निवडणुकांतही जनता आमच्याबरोबर उभी राहील.”
शिंदे यांनी सांगितलं की, “आमचा अजेंडा हा जागांचा नाही, तर विचारांचा आणि विकासाचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.”
पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणाबाबत विचारल्यावर शिंदे म्हणाले, “या प्रकरणात मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत. चौकशी सुरू असून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल. कुठलाही गैरप्रकार सरकार सहन केला जाणार नाही आणि कुणालाही पाठीशी घालणार नाही.”
राज्यात महार वतनाच्या जमिनींबाबत नव्या नियमावलीचा विचार सुरू असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं. “या प्रकरणांमध्ये न्याय्य तोडगा काढला जाईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
