Ads

--

CJI गवईवरील हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आंदोलन.

By Xtralarge News

October 11, 2025 1:19 pm

Ads

CJI गवईवरील हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आंदोलन.

मुंबई दि. ११ ऑक्टोबर ;

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका माथेफिरूने न्यायालयात हल्ल्याचा प्रयत्न करून घोषणाबाजी केली होती. मनुवादी मानसिकतेतून देशाच्या न्यायव्यवस्थेवर आणि संविधानावर केलेला हा हल्ला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेस अध्यक्षा झिनत शबरीनं यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने आंदोलन करून तीव्र निषेध केला.

सरन्यायाधीश हे देशाच्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख असतात. त्यांच्यावर न्यायमंदिरात हल्ला होणे हा संविधान आणि न्यायव्यवस्थेवरचा हल्ला आहे. हल्लेखोर वकील हा मनुवादी विचारसणीचा असून हल्ला केल्यानंतरही तो सातत्याने संविधान विरोधी वक्तव्ये करत आहे. या माथेफिरू हल्लेखोराविरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच स्तरातून त्याचा निषेध केला जात आहे. आज युवक काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजळ आरएसएसच्या स्वयंसेवकाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून या हल्ल्याचा निषेध करत तीव्र आंदोलन केले. पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेऊन आमच्यावर गुन्हे दाखल केले आहेत पण संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लढत राहू असे झिनत शबरीनं यावेळी म्हणाल्या.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर झिनत शबरीन यांचे आज मुंबईत युवक काँग्रसतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. विमानतळापासून भव्य रॅली काढून त्यांनी गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज, कुपरेज येथील माजी पंतप्रधान राजीव गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले व त्यानंतर आंदोलन केले.

No comments to show.

Leave a Comment