उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाचा विश्वासघात केला.

0
IMG-20250628-WA0107

उद्धव ठाकरेंनी मराठी माणसाचा विश्वासघात केला.

भंडारा, ता. २८ जून २०२५:

शिवसैनिक म्हणजे हिंदुत्वाचा भरलेला अंगार आहे, मात्र शिवसैनिकाची तुम्ही किंमत केली नाही, त्याला कस्पटासमान वागणूक दिली, म्हणून तुमच्यावर आता कोणी युती करतो का, अशी अगतिक होण्याची वेळ आली, असा घणाघात शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  UBT वर केला.

 

भंडारा येथे आयोजित आभार सभेत ते बोलत होते. शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचै राममंदीराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उठता बसता तुम्ही टीका करता. मात्र पहलगामध्ये लाडक्या बहिणींचे कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून धडा शिकवला. आज बाळासाहेब असते तर त्यांनी मुक्तकंठाने पंतप्रधान मोदींची स्तुती केली असती पण तुम्ही हिशेब मागता. सीमेवर जिवाची बाजी लावून लढणाऱ्या लष्कराच्या जवानांबाबत संशय व्यक्त करणाऱ्यांना जनाची नाही मनाची लाज वाटायला हवी.

सत्तेसाठी २०१९ ला मराठी माणसाचा विश्वासघात केला…

बाळासाहेब म्हणाले होते माझी काँग्रेस होऊ होऊ देणार नाही मात्र त्या काँग्रेसबरोबर तुम्ही घरोबा केला. तुम्ही २०१९ ला मराठी माणसाचा विश्वासघात केला. हिंदुत्वाचा विश्वासघात केला, बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात केला आणि तुम्हाला मतदान केलेल्या लोकांचा विश्वासघात केला. त्यामुळे २०२२ मध्ये एकनाथ शिंदेने उठाव केला. लोकसभेपाठोपाठ विधानसभेत शिवसेनेला उबाठापेक्षा जास्त मते मिळाली. शिवसेनेने ८० जागा लढवल्या आणि ६० जागा जिंकल्या. मात्र जनतेच्या न्यायालयात जाऊ म्हणणारे १०० जागा लढून केवळ २० जागा जिंकले. कारण सत्तेसाठी तुम्ही कमरेचे सोडून डोक्याला बांधले, बाळासाहेबांचे विचार सोडले, असे खडे बोल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला सुनावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *