Ads

--

आता एस टी चांगल्या हाॅटेलवरच थांबेल!

By Xtralarge News

June 14, 2025 2:34 pm

Ads

आता एस टी चांगल्या हाॅटेलवरच थांबेल!

मुंबई, दि. १३जुन ;

महामार्गावर एस टी च्या बस ज्या हाॅटेलवर थांबवल्या  जातात तेथील खाद्यपदार्थ व सेवा याबाबत अनेक तक्रारी असतात. आता मात्र त्यात बदल होईल अपेक्षा करण्यास हरकत नाही कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आता याबाबत नवीन धोरण आणले आहे. आता तरी चांगल्या हाॅटेलवरच एस टी बस थांबतील का ‘सरकारी काम फक्त कागदावरच छान’ असे होते ते पाहुयात..

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसापूर्वी पंढरपूर दौऱ्यावर असताना एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याला भेट देऊन तेथे असलेल्या प्रवाशांच्या सोयी -सुविधा पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या एसटी महामंडळाने त्वरित एक परिपत्रक काढून संपूर्ण राज्यातील अशा हॉटेल-मोटेल थांब्या बाबत नवीन आचारसंहिता जारी केली आहे.

यापुढे नवीन हॉटेल थांब्याला पारदर्शक निविदा प्रक्रियेद्वारे मान्यता देत असताना ती ३ वर्षासाठी दिली जाईल परंतु १ वर्षानंतर संबंधित हॉटेल थांब्यावरील सेवा- सुविधाचा फेरआढावा घेऊन पुढील २ वर्षीच्या मुदतवाढीबाबत विचार केला जाणार आहे. या हॉटेल थांब्याची निवड करताना तेथील स्वच्छता, अन्नपदार्थ दर्जा आणि बसेसची पार्किंग व्यवस्था यांचा प्राधान्याने विचार केला जाईल. या हॉटेल थांब्याची शिफारस करताना त्या क्षेत्रातील आगार व्यवस्थापक, विभागीय वाहतूक अधिकारी व विभाग नियंत्रक यांनी प्रत्यक्ष भेटून पाहणी करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वस्तुस्थितीजन्य अहवालाच्या आधारे संबंधित हॉटेल थांब्याला मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात या हॉटेल थांब्या संदर्भात कोणतीही प्रवासी तक्रार उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर  जबाबदारी निश्चित करुन कडक कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित हॉटेल तामिनी महामंडळाची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर एफ. आय. आर. देखील दाखल केला जाईल अशी तरतूद करण्यात आली आहे.

मार्ग तपासणी पथकाच्या माध्यमातून वेळोवेळी या हॉटेल थांब्याची तपासणी करण्याच्या सूचना देखील मध्यवर्ती कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आहेत. एकंदर प्रवाशांना योग्य सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी या हॉटेल थांब्याची  निवड करावी, तसेच त्यातून एसटी महामंडळाचा महसूल देखील वाढवा अशा दुहेरी उद्देशाने नवे हॉटेल- मोटेल धोरण एसटी महामंडळाने जारी केले आहे.

No comments to show.

Leave a Comment