‘महाराष्ट्र केसरी’ अशोक चव्हाण आता जत्रेत कुस्ती खेळतात.

0
अशोक चव्हाण kesari

‘महाराष्ट्र केसरी’ अशोक चव्हाण आता जत्रेत कुस्ती खेळतात.

मुंबई, दि. २८ मे २५:

नांदेडमध्ये भाजपाने शंखनाद सभा घेतली पण शंख कधी फुंकतात याचे भानही भाजपाला नाही. कालपर्यंत जे लोक काँग्रेसचे वजनदार नेते होते ते आता शंखनाद करत आहेत. काँग्रेसमध्ये असताना महाराष्ट्र केसरी असलेले अशोक चव्हाण आता जत्रेत कुस्ती खेळत आहेत, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

नांदेडच्या सभेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक चव्हाण यांच्यावर तोफ डागली, ते म्हणाले की, अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात असताना आमदार, खासदार, मंत्री व मुख्यमंत्री झाले. काँग्रेसमध्ये असताना ते महाराष्ट्र केसरी तर वडील शंकरराव चव्हाण हिंद केसरी होते, शंकरराव चव्हाण हे देशाचे सरंक्षण मंत्री व गृहमंत्री होते. नांदेड हे महाराष्ट्र व देशाचे नेतृत्व करणारे शहर पण त्याचे नाव घालवण्याचे काम अशोक चव्हाण यांनी केले आहे. अमित शाह यांनी नांदेडच्या सभेत काँग्रेस पक्षाच्या काळात चांगले काम झाले नाही अशी टीका केली. संरक्षण मंत्री व गृहमंत्री म्हणून यशस्वी काम केलेल्या शंकरराव चव्हाण यांचा व नांदेडचा हा अपमान आहे आणि हा अपमान होत असताना शंकररावांचे चिरंजीव अशोक चव्हाण गप्प बसले होते, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *