Ads

--

आणि छगन भुजबळ पुन्हा मंत्री झाले.

By Xtralarge News

May 20, 2025 5:47 pm

Ads

आणि छगन भुजबळ पुन्हा मंत्री झाले.

मुंबई, दि. २० मे २५ ;

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. वादग्रस्त धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर भुजबळ यांची वर्णी लागली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार मध्ये भुजबळ यांना स्थान देण्यात आले नव्हते त्यामुळे ते नाराज होते.

धनंजय मुंडे यांच्या गंभीर आरोप झाल्यावर त्यांचा राजीनामा घेण्यात आला व त्या जागेवर आज भुजबळ यांना मंत्री करण्यात आले. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय सात दिवसापूर्वीच झाला होता समजते.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. भुजबळ हे ओबीसी नेते असून शिवसेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ते अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास असून त्यांनी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महापौर, यासह विविध पदे भूषवली आहेत.

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रतिक्रीया देताना छगन भुजबळ म्हणाले, “ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे मी आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानतो. राष्ट्रवादी काँग्रेस, महात्मा फुले समता परिषद आणि माझ्या मतदार संघातील सर्वांचे आभार मानतो.”

No comments to show.

Leave a Comment