भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी !

0
images (53)

भाजपच्या ८१ जिल्हाध्यक्षांची बनावट यादी !..

मुंबई, दि. १९ मे २५;

सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट असून, तिचा पक्षाशी कोणताही संबंध नाही, अशी माहिती भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत निवेदनाद्वारे दिली आहे. आतापर्यंत भाजपच्या फक्त ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित जिल्हांची निवड प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बनावट यादीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन रवींद्र चव्हाणांनी केले आहे.

सदरील बनावट यादीत अनेक चुकीची नावं असून, ती हेतुपुरस्सरपणे पसरवण्यात येत असल्याची शक्यता पक्षानं व्यक्त केली आहे. उर्वरित जिल्ह्यांची निवड प्रक्रिया सुरू असून, ती लवकरच पूर्ण होईल, असंही रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे.

या प्रकारामुळे पक्षाची बदनामी होण्याची शक्यता असून, बनावट माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार दाखल करण्यात येणार आहे.पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी फक्त अधिकृत माध्यमांद्वारे जाहीर होणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही रवींद्र चव्हाणांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *