जातीजनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल:
जातीजनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल:
परभणी, दि. ६ मे २०२५:
राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरल्याने मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. जातनिहाय जनगणना झाली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल. ओबीसीला २७ टक्के आरक्षण आहे ते सुद्धा ६५ टक्क्यांपर्यंत वाढू शकते असे काँग्रेस प्रदेशाध्क्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
परभणीत एका कार्यकर्मात बोलताना सपकाळ पुढे म्हणाले की, भाजपा मात्र जाती जातीत भांडणे लावत आहे अशावेळी बहुजन समाज एकत्र असणे ही काळाची गरज आहे. राज्यात रोज ६ शेतकरी आत्महत्या होत आहेत, मुलांना नोकरी मिळत नाही आणि सरकारला मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून अदानी अंबानींचे हित महत्वाचे वाटत आहे. गरज नसताना ८८ हजार कोटींचा शक्तीपीठ महामार्ग निर्माण करण्यात सरकार प्राधान्य देत आहेत.
