याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार स्वगृही.

0
IMG-20250417-WA0175

याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार स्वगृही.

मुंबई, दि. १७ एप्रिल :

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र याज्ज्ञवल्क्य जिचकार यांनी आज काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला. निवडणुकीच्या काळात त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, ती मागे घेऊन त्यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय टिळक भवन येथे एका कार्यक्रमात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे काँग्रेस परिवारत स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

“आपण काँग्रेस विचारााचे पाईक असून काँग्रेसची विचारधारा तरुण वर्गात रुजवण्यासाठी काम करत आहे. काँग्रेस पक्षात तरुणांचा नेतृत्वाची संधी दिली जाते आणि काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे. मला काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश दिल्याबद्दल रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ व सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेन”, असे याज्ज्ञवल्क्य जिचकार यांनी यावेळी म्हटले.

 

याज्ञवल्क्य हे ज्ञानयोगी डॉक्टर श्रीकांत जिचकार यांचे सुपुत्र असून त्यांनी विधानसभा निवडणुकीत नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. काटोल हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ होता. यंदाच्या निवडणुकीत तेथून अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. त्यांनी काटोल व भारतभर युवकांना रोजगाराशी जोडण्याचे काम केले आहे.

 

यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आमदार नाना पटोले, खा. डॉक्टर कल्याणराव काळे, रवींद्र चव्हाण, रजनी पाटील, शोभाताई बच्छाव, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, चंद्रकांत हांडोरे, शामकुमार बर्वे, बळवंत वानखडे, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, नसीम खान विश्वजीत कदम, मा. खा. हुसेन दलवाई, आमदार अमीन पटेल, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार स्वगृही परतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *