रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचे उपोषण.

0
-supriya-sule

रस्त्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंचे उपोषण.

पुणे दि. १० एप्रिल:

भोर तालुक्यातील श्रीक्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्याचे क्रॉंक्रिटीकरण करावे यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊनही सुरु झाले नाही. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बनेश्वर देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम अजून झालेले नाही हे खूप दुर्दैवी आहे. ज्या शहरामध्ये करोडो रुपयांची मेट्रो होऊ शकते, करोडो रुपयांचे रस्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात देशभरात होत आहेत. नितीन गडकरी यांच्याकडे कधीही गेलो की ते कामाला नाही म्हणत नाहीत. बारामती लोकसभा विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर रस्त्याचं काम झालं आहे. पण दुर्दैव आहे भोर येथील श्रीक्षेत्र बनेश्वर देवस्थानकडील दीड किलोमीटरचा रस्ता हा गेल्या कित्येक वर्षांपासून झालेला नाही. तिथल्या रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या रस्त्यासंदर्भात पाठपुरावा केला जात आहे. मात्र, या रस्त्यावरील खड्डे देखील बुझवले जात नाहीत. प्रशासनाकडून पीएमआरडीचा प्लॅन असल्याचं सांगितलं जात आहे. आज लाखो लोक बनेश्वरला जात असतात. सगळ्यांना रस्त्यामुळं मोठा त्रास सहन करावा लागतो. एका दीड किलोमीटरच्या रस्त्यासाठी वणवण करावी लागत आहे. या रस्त्यासाठी मंत्रालयापासून सर्वच ठिकाणी निवेदन देण्यात आलं असताना देखील रस्त्याची डागडुजी कली जात नाही. जोपर्यंत या रस्त्यासाठी वर्क ऑर्डर निघत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

बनेश्वर हे आमच्या श्रद्धेचा विषय असून या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. मात्र, तसं घडताना दिसत नाही. या रस्त्याचं काम व्हावं यासाठी शासनाकडं देखील पाठपुरावा केला आहे. मात्र, रस्त्याचं काम झालं नाही. भिजत घोंगडं राहिलेलं काम पूर्ण व्हावं म्हणून बेमुदत उपोषणाच्या आंदोलनाचं अस्त्र उगारावं लागल्याची असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *