Ads

--

मुंबई हल्ल्यातील शहिदांना अभिवादन..

By Xtralarge News

November 26, 2024 11:25 am

Ads

मुंबई हल्ल्यातील शहिदांना अभिवादन..

मुंबई, दि. २६ नोव्हेंबर:

26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी मुंबईवर केलेल्या हल्ल्यामध्ये पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि हजारो सर्वसामान्य नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस मुख्यालयातील शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून या शहिदांना विनम्र अभिवादन केले. यावेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटूंबियांना भेटून त्यांनाही आधार दिला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि पोलीस आणि राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No comments to show.

Leave a Comment