नगरविकास विभागातील घोटाळ्याची चौकशी करणार.

0
20241118_105146

नगरविकास विभागातील घोटाळ्याची चौकशी करणार.

 

मुंबई, दि. १८ नोव्हेंबर :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागातील घोटाळा आदित्य ठाकरे यांनी उघड केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास विभागातील घोटाळ्यांची चौकशी करणार असल्याचा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. यावेळी २६-१२-२०२२ ची MMRDA ची दोन पत्रेही आदित्य ठाकरेंनी दाखवली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, मेट्रोच्या लाइनचे गर्डर टाकण्याआधीच रंग काम केलं केलं.मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या रंगरंगोटीसाठी MMRDA ने एक पत्र दिलं आहे, त्यानंतर ४ ऑक्टोबरला निविदा काढण्यात आली,ज्यामध्ये मेट्रो पोल आणि इतर भागांना रंगरंगोटी करण्यात येईल असं म्हटलं आहे. ७४ कोटी रुपये काम होण्या आधी रंगरंगोटीसाठी खर्च केले जात आहेत हे पैसे कॉन्ट्रॅक्टरच्या खिश्यात जात आहेत. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रंगरंगोटी करणार पुन्हा खर्च करणार असा हा घोटाळा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा शिवतीर्थावर पार पडली, या सभेविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की ‘जिथे माझ्या आजोबांचं बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृति स्थळ आहे, त्या ठिकाणी त्यांची शिवतीर्थावर सभा घेण्याची हिंमत झाली . पण तिथे एवढी मोठी सभा आयोजित केली पण खुर्च्या रिकाम्या होत्या, फक्त खुर्च्या रिकाम्या नव्हत्या तर त्यांचं मन आणि हृदय सुद्धा रिकाम होतं’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *