भाजपाच्या लोढांचा मलबार हिल मधून अर्ज दाखल_

0
IMG-20241024-WA0064

मुंबई दि. २४ ऑक्टोबर:

भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मंगल प्रभात लोढा यांनी मलबार हिल विधानसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. ३० वर्षापासून मलबार हिल विधानसभा मतदार संघातून मंगल प्रभात लोढा सातत्याने आमदार म्हणून निवडून येत आहेत. या निवडणुकीत सुद्धा आपण नक्की जिंकू.मलबार हिल विधानसभा मतदारसंघासाठी काम करण्याची संधी पुन्हा एकदा जनता देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ” मलबार हिल विधानसभा क्षेत्रातील जनता आमच्या सोबत आहे. नक्कीच इथून महायुतीचाच उमेदवार निवडून येईल. मी गेले १० दिवस येथील लोकांना भेटतो आहे आणि या वेळी नागरिकांचा उत्साह कौतुकास्पद आहे. यावेळची निवडणूक मी नाही तर स्वतःच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनताच लढणार आहे. सर्वजण आज मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. यावेळी मी सातव्यांदा उमेदवारी अर्ज भरत असून, संपूर्ण मलबार हिलमधील जनता यावेळी सुद्धा माझ्या साथीला आहे. इतके वर्ष मला सहकार्य केल्याबाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. फक्त मलबार हिलमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा येईल.

मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आणि राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून देखील मागील २ वर्षांच्या काळात काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *