मुलाला बिनविरोध निवडून आणण्याचा गजानन कीर्तिकरांचा कट.

0
images - 2023-11-10T193746.316

मुंबई, दि. २३ मे :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून उमेदवारी मिळवायची. अमोल कीर्तिकरसमोर गजानन कीर्तिकर उमेदवार राहतील. दुसरा कुणी उमेदवार नसेल आणि अर्ज मागे घेण्याच्यावेळी गजानन कीर्तिकर आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार व आपल्या मुलाला बिनविरोध खासदार म्हणून निवडून आणायचे, असा गजानन कीर्तिकर यांचा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत पुण्यातील कार अपघातावर बोलताना दरेकर म्हणाले कि, अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगाचा राजकारणासाठी वापर करणे योग्य नाही. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुणे पोलीस आयुक्तालयात जाऊन कडक कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घालणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. गृहमंत्री असूनही जनतेच्या हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी केली. ज्या ३०४ अ कलमासंदर्भात विरोधक टीका करताहेत ते ३०४ कलम असल्याचा दावाही गृहमंत्री फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. ते स्वतः वकील असल्याने पोलिसांइतकेच त्यांनाही कायद्याचे ज्ञान आहे. राज्याचे ते मुख्यमंत्री राहिले आहेत. ते नवखे नाहीत. पोलीस त्यांना चुकीची माहिती देऊ शकत नाहीत. त्यांना कलमं माहित आहेत. ज्या पबमध्ये आरोपी गेला होता त्या पबवरही कारवाई झालेली आहे. त्यामुळे विरोधक या प्रसंगाचे फक्त राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत असल्याचे दरेकर म्हणाले.

 

रविंद्र धंगेकर आणि निलेश लंके यांच्या विधानावर बोलताना दरेकर म्हणाले कि, रविंद्र धंगेकर एकदा आमदारकीत विजय मिळाल्यामुळे समजात वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करून आपले नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु अशा प्रकारच्या गोष्टींना जनता फसणार नाही. कारण सरकार, मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री या विषयात गंभीर आहेत. कारवाई करताहेत. धनगकरांना केवळ या विषयाचे राजकारण करायचे आहे. धंगेकर पराभूत होणार असल्याचे माहित असल्याने त्यांची नौटंकी सुरू आहे. निलेश लंकेही त्याच धाटणीतील आहेत. त्यांचाही पराभव होणार आहे. बाळूमामा म्हात्रेही भिवंडीतून हरणार आहेत. तसेच अनिल देशमुख यांनी फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचाही दरेकरांनी चांगलाच समाचार घेतला. जे गृहमंत्री म्हणून तुरुंगात जाऊन आले, ज्यांनी शंभर कोटीचे वाझेला टार्गेट दिले होते, ज्यांनी बदल्यांमध्ये हैदोस घातला होता त्यांना नैतिक अधिकार तरी आहे का? अनिल देशमुख यांनी नाकाने कांदे सोलू नये, असा टोला दरेकरांनी लगावला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *