Ads

--

वांद्रे पश्चिम येथे महायुतीच्या कार्यालयाचे उद्घाटन.

By Xtralarge News

April 30, 2024 9:22 am

Ads

मुंबई, दि. ३० एप्रिल:

उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम, मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत वांद्रे पश्चिम विधानसभा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

भाजपा प्रणीत नवभारतीय वाहतूक संघटना आणि भाजपा ट्रान्सपोर्ट यांच्यातर्फे हाजी अराफत यांनी रंगशारदा येथे आयोजित केलेल्या मेळाव्याला उत्तर मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम, आमदार अँड आशिष शेलार, मुंबई सचिव संजय उपाध्याय आदींनी उपस्थितीत राहिले.

त्यानंतर आमदार आशिष शेलार यांच्या सोबत उज्वल निकम यांनी माजी आमदार दिवंगत रामदास नायक यांच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानी जाऊन जयश्री रामदास नायक यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी अरुण साठे आणि माजी नगरसेविका क्रांती साठे यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तसेच रामकृष्ण मठ, आणि सांताक्रूझ येथील जैन मंदिरात जाऊन संताचे आशिर्वाद घेतले.

 

त्यानंतर वांद्रे पश्चिम लिंकीग रोड येथे सुरु करण्यात आलेल्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. स्थानिक नगरसेवक, महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते.

No comments to show.

Leave a Comment