उद्धव ठाकरेंच्या अहंकारामुळे राज्याचे नुकसान..

0
IMG-20240420-WA0041

डोंबिवली दि. २२ एप्रिल :
मी डॉक्टर नसलो तरी अनेक सर्जरी केलेल्या आहेत. काही लोकांचे गळ्याचे पट्टे गायब झाले, काही लोकं फास्ट फिरायला लागले, चालायला लागले,  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सहकार्य मागण्यासाठी कशाला काही वाटायला हवे. विकासासाठी आम्ही सहकार्य मागत असतो. मात्र अहंकारी लोकं आपल्या इगोसाठी राज्याचे नुकसान करतानाही आपण बघितले अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचे नाव न घेता केली.

एकनाथ पुढे म्हणाले की, खरे वाघ आम्हीच असून काही नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले. हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर असून वाघाचे कातडे पांघरलेल्या शेळ्या आपण चांगल्या प्रकारे ओळखून आहोत. जेव्हा 2022 ला सरकार स्थापन केलं. त्यावेळची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. शेवटी सहकार्य योगदान मागायचे असते.

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मनसे आमदार राजू पाटील आदी महायुतीच्या प्रमूख नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी दिलखुलासपणे खासदार डॉ. शिंदे यांनी दहा वर्षात केलेल्या विकासकामांचे कौतुक केले.

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कामाबद्दल समाधानी असून त्याची विकासाची गाडी राईट ट्रॅकवरच नाही तर फुल स्पीडमध्ये आहे. तर डॉ.श्रीकांत शिंदे आता केवळ खासदार नाही तर संसदरत्न असून त्याचाही आपल्याला अभिमान असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तर कल्याण लोकसभेच्या मतदारसंघांनी त्याला खासदार म्हणून त्याला स्वीकारलेलं असून बाळासाहेबांचे आशीर्वाद आणि मोदीजींनी ठेवलेला विश्वास आणि मतदारांचा आशीर्वाद तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची घेतलेल्या मेहनतीमुळे डोंगराएवढी ही कामे करणे शक्य झाल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर चौफेर विकास कसा करायचा याची नस त्याला कळलेली असून आपण त्याला 2014 मध्ये निवडून दिलेत, 2019 मध्ये निवडून दिले आणि 2024 मध्येही पुन्हा निवडून देणार असल्याचा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *