Ads

--

कॉंग्रेसचे ‘न्‍यायपत्र’ म्‍हणजे ‘झूटपत्र’..

By Xtralarge News

April 5, 2024 10:55 pm

Ads

मुंबई, दि. ५ एप्रिल;

जे देणे शक्‍य नाही, जे देता येणार नाही, कॉंग्रेसने 60 वर्षात कधी दिले नाही, अशा सगळया घोषणा करुन सादर केलेले कॉंग्रेसचा न्‍यायपत्र नावाचा जाहीरनामा म्‍हणजे हे न्‍यायपत्र नसून झूटपत्र आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी महायुतीच्‍या मेळाव्‍यात केली.

भाजपा, शिवसेना, राष्‍ट्रवादी, रिपाई महायुतीतर्फे मुंबईत प्रत्‍येक विधानसभा क्षेत्रामध्‍ये 36 मेळावे घेण्‍यात येणार असून याची सुरूवात आज वाद्रे पश्‍चिम विधानसभा क्षेत्रातून करण्‍यात आली. महायुतीचा हा पहिला मेळावा रंगशारदा येथे पार पडला.

यावेळी प्रमुख वक्‍ते म्‍हणून बोलताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी आपल्‍या भाषणात वांद्रे पश्‍च‍िम विभागात‍ महायुतीच्‍या काळात झालेल्‍या कामांचा सविस्‍तर उहापोह केला. यावेळी ते म्‍हणाले की, विरोधी पक्षांनी वांद्रे पश्‍चिम विभागात केलेले एक काम दाखवा, त्‍यांनी या मतदार संघात मते मागण्‍यासाठी येऊच नये. त्‍यांचे तत्‍कालिन पर्यावणमंत्री पेज 3 च्‍या पार्ट्यांसाठी येऊन इथले पर्यावण बिघडवण्‍याचेच काम करीत होते, ते काय करीत होते हे माझ्या पेक्षा राहुल कनाल हे अधिक चांगले सांगतील.

महामानव भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली घटना बदलणार असा अपप्रचार आज वरोधक करीत आहेत. ते हे का विसरत आहेत की, हेच ते कॉंग्रेसवाले आहेत त्‍यांनी घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले होते. एवढेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍याप्रती कधी प्रेमही दाखवले नाही. तर कॉंग्रेसने आपल्‍या राजवटीत अनेक वेळा घटना बदलण्‍याचे काम केले त्‍यामुळे आज केवळ खोटे बोलून दिशाभूल करण्‍याचे काम कॉंग्रेस करीत आहे.

आज जाहीर करण्‍यात आलेला कॉंग्रेसचा जाहीरनामा म्‍हणजे असाच एक खोटारडेपणाचा कळंस म्‍हणावा असाचा आहे. त्‍यांनी जाहीरनाम्‍याचे नाव न्‍यायपत्र असे ठेवले आहे. महाराष्‍ट्र कॉंग्रेसचे पदेशाध्‍यक्ष नाना पटोले जागा मिळाव्‍यात म्‍हणून आघाडीतील घटक पक्षाच्‍या दारोदारी फिरत आहेत, जे आज आपल्‍या कार्यकर्त्‍यांना न्‍याय देऊ शकत नाहीत, ते या देशाला न्‍याय मिळवून कसे देणार आहेत. त्‍यांनी घटनेचे संरक्षण करण्‍याची बाब नमुद केली आहे. मग आणिबाणीमध्‍ये या देशाला कुणी ढकलले, हे आज युवा वर्गाला न्‍याय देण्‍याची बात करीत आहेत, मग जेएनयुमध्‍ये तरुणांची माथी कुणी भडकवली, हे आज शिक्षणाला न्‍याय देण्‍याची घोषणा करीत आहेत मग नवे शैक्षणिक धोरण कुणी रोखले, आज हे भ्रष्‍टाचार कमी करणार असे सांगत आहेत कॉग्रेसच्‍या घोटाळयांची यादीच वाचून दाखवत आमदार अॅड आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. आदिवासींना न्‍याय देण्‍याचे कॉंग्रेस बोलत आहे मग आदिवासी समाजातील श्रीमती द्रौपदी मुर्मु राष्‍ट्रपती झाल्‍या त्‍यावेळी त्‍यांना कॉंग्रेसने पाठींबा का दिला नाही असा थेट सवाल करीत आमदार अॅड आशिष शेलार म्‍हणाले की, ज्‍यांनी कोविडमध्‍ये घोटाळे केले ते आज आरोग्‍याला न्‍याय देण्‍याची घोषणा करीत आहेत, ज्‍यांनी कोविडमध्‍ये मजुरांची खि‍चडी खाल्‍ली ते श्रमिकांना न्‍याय देण्‍याची घोषणा करीत आहेत. 400 रुपयात गॅस सिलेंडर देणार असे सांगत आहेत, मग आज कॉंग्रेसची सत्‍ता ज्‍या राज्‍यात आहे, त्‍या राज्‍यात का 400 रुपयांना गॅस सिलेडर देत नाही, असा थेट सवाल करीत आमदार आशिष शेलार यांनी केला

यावेळी शिवसेना सचिव किरण पावसकर, रिपाइंचे मुंबई अध्‍यक्ष विवेक पवार, गौतम जाधव, राष्‍ट्रवादीचे जफरभाई, नरेंद्र राणे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला कुणाल सरमळकर, जयश्री नायक, राहुल कणाल, सुशम सावंत, जितेंद्र राऊत, संतोष धुवाळी, वीणा भागवत, यांच्‍यासह माजी नगरसेवक, चारही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन किशोर पुनवत यांनी केले.

No comments to show.

Leave a Comment