.. ही यादी तर ठाकरेंच्या पराभवाची पहिली पायरी

0
20240129_200644

मुंबई, दि. २८ मार्च;

एक खिचडीतील भ्रष्टाचारी, एक जुना राष्ट्रवादी यांनी घेतला कडेवरी आणि एक बांडगूळा सारखा आमच्या मतांचा त्यावेळचे वाटेकरी …. उद्धव ठाकरेंची यादी म्हणजे पराभवाची पहिली पायरी, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

उबाठा गटाची यादी जाहीर झाली त्यामध्ये पराभवाची पायाभरणीच करण्यात आली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी सोबत ज्या पद्धतीने अहंकाराने वागत आहेत, त्यावरून आता काँग्रेसला ही कळेल आणि महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना ही कळून चूकले आहे की, ठाकरे गट म्हणजे अहंकाराने भरगच्च भरलेला फुगा आहे, अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

सभांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पार्कची मागणी करणाऱ्या उबाठा गटाचा समाचार घेताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, लोकसभेची लढाई यावेळी “देव-देश-धर्मासाठी” आहे. त्यामुळे हिंदू “शक्तीचा” पराभव करण्यासाठी निघालेल्या अधर्मवादी “शक्तींना” छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचे आमचे दादरचे ऐतिहासिक मैदान हवे कशाला?

ठाकरे गटाला पुन्हा एकदा इंडिया आघाडी नावाचा “दहा तोंडी रावण” छत्रपती शिवाजी महाराज मैदानात उभा करुन हिंदू “शक्तीला” पराभव करण्याचे ऐलान करायचे आहे काय?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांकडे पुरावे मागणाऱ्यांना… स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्यांना …हे मैदान देऊ नये…!

ऐतिहासिक शिवतीर्थ तर “मावळ्यां”चे पालिकेने का पुरवावे डोहाळे या “डोम कावळ्यां”चे? अशा शब्दांत आमदार अँड आशिष शेलार यांनी हल्लाबोल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *