Ads

---

‘गर्व से कहो हम हिंदू है’ कोणत्या तोंडाने म्हणणार?

By Xtralarge News

March 17, 2024 5:18 pm

Ads

मुंबई, दि. १७ मार्च :-

ज्या शिवतीर्थावरून बाळासाहेबानी संपूर्ण हिंदुस्थानाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या वारसदाराला त्याच शिवतीर्थावर ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्या राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसायची वेळ आलेली आहे. खरं तर राहुल गांधी यांनी सर्वप्रथम सावरकर स्मारकात जाऊन अभिवादन करायला हवे, कारण सावरकर ही देशाची अस्मिता आहे. त्यांच्यावर वाट्टेल ते आरोप करणं, शिव्या शाप देणे हे कोणतं हिंदुत्व आहे..? आणि सावरकरांचा होत असलेला अपमान निमूटपणे सहन करणे हे शिवसैनिकांचे दुर्दैव आहे उद्धव ठाकरे हे गर्व से कहो हम हिंदू है हे आता कोणत्या तोंडाने म्हणणार असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारला.

शिवसेनेसाठी आणि शिवसैनिकांसाठी आजचा दिवस हा काळा दिवस असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ज्या काँग्रेसला बाळासाहेबानी कायम दूर ठेवले त्यांच्यासोबत बसायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन असं मत व्यक्त केलं होतं. तेच आज सत्तेसाठी, खुर्चीसाठी, मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्याजवळ जाऊन बसले आहेत. जे आपल्या देशाची बदनामी परदेशात जाऊन करतात, पंतप्रधानांची बदनामी विदेशात जाऊन करतायत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे हे दुर्दैव असल्याचे मत शिंदे यांनी व्यक्त केले.

No comments to show.

Leave a Comment