CIDCO च्या गलथान कारभारामुळे ‘स्वप्नपूर्ती’ ची लिफ्ट बंद.

0
images (100)

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी;

नवी मुंबईतील खारघर येथील सिडकोच्या स्वप्नपूर्ती हाऊसिंग कॅाम्प्लेक्सचा वीज पुरवठा कोणतीही पूर्वसुचना न देता महावितरणने बंद केला आहे. स्वप्नपूर्तीचे १६ लाख वीज बिल न भरल्याने महावितरणने लिफ्टचा वीज पुरवठा बंद केला आहे. टप्प्याटप्याने कारवाई करत पाणी पुरवठा ही बंद केला जाईल असे सामजते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाच्या अंतर्गत सिडको विभाग येतो तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा विभागाच्या अंतर्गत महावितरण कार्यरत आहे. सिडको व महावितरणमघ्ये समन्वयाचा अभाव आहे. पाच हजारांहून अधिक लोक स्वप्नपूर्तीत राहतात. जवळपास ५० बिल्डींग स्वप्नपूर्तीत असून यापैकी बहुतेक १४ मजली ईमारती आहेत. लिफ्ट बंद झाल्याने रहिवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

सिडको कोट्यवधींची कमाई करीत असताना १६ लाखांचे वीजबिल न भरल्याबद्दल रहिवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. लिफ्ट नंतर पाणी पुरवठा बंद होणार असल्याने संतप्त रहिवाशी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तास दोन तासासाठी यवतमाळला येत आहेत. मोदींच्या या दौ-यावर सरकार 14 कोटी रुपये खर्च करत आहे. एका कार्यक्रमासाठी जे सरकार 14 कोटी रुपये खर्च करते त्या सरकारकडे वीज बिल भरण्यासाठी 16 लाख रुपये नाहीत का ?असा संतप्त सवाल विचारला जात आहे. स्थानिक भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *