मुंबईच्या मोक्याच्या सरकारी जागा मोदानीच्या घशात!

0
images (21)

मुंबई, दि. २२ फेब्रुवारी:

भारतीय जनता पक्षाचे सरकार अदीनासाठी काम करत असल्याचे जगजाहीर आहे. केवळ एका व्यक्तीसाठी सर्व सरकारी यंत्रणा राबत आहे, सर्व नियम, अटी अदानीचा फायदा पाहून आखल्या जात आहेत.मुंबईच्या मोक्याच्या तसेच सरकारी जागा मोदानीच्या घशात मोफत घालण्याचा प्रयत्न सुरु असून अदानीसाठी भाजपा सरकार लँड माफियासारखे काम करत असल्याचा गंभीर आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

महानंद दुग्ध प्रकल्प गुजरातला दिल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महानंदच नाही तर मुंबईच्या सर्वच मोक्याच्या जागा मोफत अदानीला देण्यासाठी भाजपा सरकार काम करत आहे. मुंबई एअर पोर्ट, एअर पोर्ट कॉलनी, धारावी, मुलुंड, देवनार, मिठागराच्या जागेबरोबरच एमएसआरडीसी ची वांद्र्याची जमीन देण्याचा घाट घातला जात आहे. सर्व अटी केवळ एका व्यक्तीचे हित पाहून तयार केल्या जात आहेत. वांद्रा रिक्लमेशनच्या जमिनीसाठी टेक्निकल व फायन्सियल बिड कोणासाठी केली ते सर्वांना माहित आहे, त्यावर अनेकांनी हरकत घेतल्या परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले. वरळीची जागाही कोणाला देण्याचा प्रयत्न सुरु आहे हे मुंबईकरांना माहित आहे. मोदानीसाठी मुंबईची लुट सुरु असून मुंबईच्या हक्काच्या सर्व महत्वाच्या जमिनी आगामी काळात मोदानीच्या होतील, यात शंकाच नाही असे प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *