मुंबई भाजपाचा श्रीराम आनंद सोहळा..
मुंबई दि. १८ जानेवारी :
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर मुंबई भाजपाच्या वतीने श्रीराम आनंद सोहळ्याच्या माध्यमातून भव्य गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र श्रेष्ठ कवी गदिमा यांचे शब्द आणि बाबुजी अर्थात सुधीर फडके यांचं अद्वितीय संगीत आणि मधूर आवाज असलेली गाणी नामांकित गायकांकडून ऐकण्याची सुवर्णसंधी मुंबईकराना मिळणार आहे, अशी माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी दिली.
कार्यक्रम २० ते २३ जानेवारी या कालावधीत मुंबईत चार ठिकाणी होणार आहेत. याशिवाय मुंबईत ठिकठिकाणी प्रत्येक विभागात महाआरती, देवळांची साफसफाई, रोषणाई, विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
संयोजन जीवन गाणी तर संगीत संयोजन प्रशांत लळीत यांचे असणार आहे. गायक ऋषिकेश रानडे, निनाद आजगावकर, अभिषेक नलावडे, सोनाली कर्णिक, केतकी भावे – जोशी यांचे गीत सादरीकरण डॉ. संजय उपाध्ये यांचे निवेदन तर सोनिया परचुरे आणि ग्रुपचे नृत्य सादरीकरण असणार आहे. मोफत प्रवेशिका दोन व्यक्तींसाठी असणार असून कार्यक्रमादिवशी तिकीट खिडकीवर आसन क्रमांक देऊन नाट्यगृहात प्रवेश दिला जाईल.
