Ads

---

शिवसेना एकनाथ शिंदेंचीच! 

By Xtralarge News

January 10, 2024 11:19 pm

Ads

शिवसेना एकनाथ शिंदेंचीच!

मुंबई, दि. १० जानेवारी:

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घटना असलेल्या शिवसेना कुणाची याचा फैसला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देऊन राजकीय चित्र स्पष्ट केले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा निर्णय देत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. २१ जून २०२२ ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळे पुरावे, साक्षी यांचा विचार करता शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.

 

निकालाचे वाचन करताना राहुल नार्वेकर म्हणतात, ‘दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या त्यामुळे मी निवडणूक आयोगाने दिलेली घटना विचारात घेतली. दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण यावरुन गोंधळ असल्याचे दिसले. उद्धव ठाकरेंनी जी शिवसेनेची घटना दिली त्यावर कुठलीही तारीख नाही. शिवसेनेची १९९९ ची घटना मी मान्य करतो. उद्धव ठाकरे हे उलटतपासणीसाठी आले नाहीत त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र विचारात घेतलेलं नाही.

 

उद्धव ठाकरे यांनी २०१८ मध्ये केलेली घटना दुरुस्ती ही अयोग्य होती तसेच निवडणूक आयोगाकडे १९९९ मध्ये घटनेत केलेले बदल बरोबर आहेत. त्यामुळं त्यावेळची घटना वैध मानता येईल पण २०१८ मध्ये करण्यात आलेले बदल वैध नाही. एकनाथ शिंदे यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचा अधिकार उद्धव ठाकरेंना नाही. पक्षप्रमुख एकटेच निर्णय घेऊ शकत नाहीत, राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम असतो. २०१८ ची पदरचना ही शिवसेनेच्या घटनेप्रमाणे नव्हती. कुणालाही पदावरुन काढण्याचा किंवा पक्षातून हकालपट्टीचा अधिकार पक्षप्रमुखांना नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी मान्य करता येत नाही. उद्धव ठाकरेंचा निर्णय मान्य करायचा झाला तर पक्षातल्या कुणालाच त्यांच्याविरोधात बोलता येणार नाही. पक्षप्रमुखाला सगळे अधिकार देणं हे लोकशाहीसाठी घातक आहे.

नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे व भरत गोगावले यांची प्रतोद पदाची निवड वैध ठरवर सुनिल प्रभूंची निवड अवैध ठरवली. ठाकरे गटाच्या याचिका फेटाळत एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व १६ आमदारांना पात्र ठरवले.उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनाही अपात्र केले नाही.

 

No comments to show.

Leave a Comment