Ads

---

दिघा रेल्वे स्टेशनसाठी आदित्य ठाकरे मैदानात.

By Xtralarge News

January 9, 2024 1:05 pm

Ads

दिघा रेल्वे स्टेशनसाठी आदित्य ठाकरे मैदानात..

मुंबई, दि. ९ जानेवारी,
सर्वसामान्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे दिघा स्टेशन ९ महिन्यांपासून उद्घाटनाविना बंद आहे, हे स्थानक सुरू करावे, या मागणीसाठी आदित्य ठाकरेंनी ऐरोलीत धडक देत दिघा रेल्वे स्थानक सुरू करण्या संदर्भात सरकारला इशारा दिला.

अनेक महिने हे दिघा स्टेशन तयार असून आपण वाट बघतोय की स्थानकावर ट्रेन कधी येईल?तसा देशाला प्रश्न पडला आहे की हेच का अच्छे दीन ? गेल्या 10 वर्षात आले का अच्छे दिन ? 15 लाख आले का तुमच्या खात्यात ? जनतेला अच्छे दिन आले की नाही ते माहीत नाही पण खोकेदारांकडे अच्छे दिन आले आहेत, असा घणाघात केला.

मी आधी पासून सांगतोय 2024 हे वर्ष आपले आहे, मोठे काही करू नका नाही तर पोलिसांवर प्रेशर येईल की उद्घाटन करतात की काय? मुंबईत असाच एक ब्रीज आहे त्याला मी delay ब्रीज नाव दिले आणि उद्घाटन केले शेवटी झाले तेच केस झाली पण इथे घुसून फायदा नाही कारण आपल्याला ट्रेन चालवला येत नाही आणि यांना सरकार चालवता येत नाही. मी सरकारला विचारतो आहे की अन्याय जर करायचा आहे तर महाराष्ट्र एकमेव राज्य असे काही कलम केले आहे का ? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारला केला.

वेदांता गेला की नाही? आपल्या तरुणांनी जायचे कुठे, वेदंतामुळे दीड लाख रोजगार आपल्याकडून गेले पण गेले कुठे तर गुजरातमध्ये. वर्ल्ड कप फायनल पण गेले कुठे तर गुजरातला, इथे असती तर आपण जिंकलो असतो. जिथे जिथे वाद झाले तिथे तिथे त्यांचा पक्ष जिंकला आहे. MTHL अडीच महिने तयार आहे पण उद्घाटन नाही, काल जाऊन फोटोग्राफी करून आले, जर 15 जानेवारीपर्यंत उद्घाटन केले नाही तर आम्ही जाऊन करू, उरण रेल्वे, मंकोली ब्रीज तयार आहे हे स्टेशन 9 महिने झाले तयार आहे, लाईट सुरू आहे सफाई सुरू आहे पैसे कोण भरते आहे तर आपण, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आता देशात वन नेशन वन पोल सूचना जारी झाली आहे, यांची निवडणुका घ्यायची हिम्मत नाही आणि आता हे एकच निवडणूक घेणार पण या महाराष्ट्रावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. मला माझ्या महाराष्ट्रातील जनतेला उत्तर द्यायचे आहे म्हणून आज इथे आलो आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment