मुंबईत २४ वर्षात NCP पक्ष वाढला नाही..

0
ajit pawar

मुंबई दि. ८ जानेवारी –

मुंबईमध्ये २४ वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यापध्दतीने वाढायला हवा होता तसा वाढला नाही, आमचे लक्ष फक्त ग्रामीण भागाकडेच राहिले. आता समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जे काम सुरू आहे त्यातून आपल्याला नक्कीच बळ मिळेल. आम्ही तुमच्यासोबत आहोत असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार षण्मुखानंद सभागृहातील कार्यकर्ता संवाद मेळाव्यात बोलक होते.

अजित पवार म्हणाले की, कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आणि कार्यकर्त्यांच्या बळावर आगामी निवडणुकांचे युध्द आपल्याला जिंकायचे आहे. आता आपल्याला वेळ कमी आहे. सुरुवात चांगली झाली आहे त्यामध्ये सातत्य ठेवा. काम करताना खटका उडत असतो मात्र तो समजून घेऊन काम करा. ज्याला पद देत आहात किंवा देणार आहात त्यांची प्रतिमा त्याच्या विभागात चांगली आहे का याचाही विचार करा. आठवडयातील एक दिवस आपल्या आमदारांना वेळ द्यायला सांगेन. कार्यकर्ते कामाला लागले की काय होते हे आज दिसले.शिवसेना फक्त मुंबईत होती त्यानंतर ती कोकणात पोचली. आपल्यातही ती जिद्द आहे आपणही तसे काम सुरू करु. मुंबापुरीला एक रुपयाचा निधी कमी पडू देणार नाही असा शब्दही अजित पवार यांनी दिला.

धारावीतील टेंडरमुळे एका उद्योगपतीला फायदा होणार आहे अशी बोंब मारली जात आहे.त्याच्या खोलात जाऊन माहिती घेऊ. जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे. प्रश्न सोडविण्याची ताकद आणि धमक आपल्यात आहे. महायुतीच्या माध्यमातून सरकार राज्यात काम करत आहे. मुंबईत विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेत योग्य ती आणि म्हणावी अशी संख्या गाठू शकलो नाही. आपल्या वॉर्डात निवडणूक लढणार्‍या व्यक्तीच्या पाठीशी ताकद उभी करायला हवी. चांद्यापासून बांद्यापर्यंत जास्तीत जास्त जागा निवडून कशा येतील असा प्रयत्न करायचा आहे. हे राज्य माझे आहे, सर्वसामान्य लोकांचे सरकार आहे हा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस जनतेला काम करताना देत आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

समीर भिजबळांच्या पाठीशी उभे राहून एकदिलाने काम केले तर पक्षाची ताकद मुंबईत उभी राहिल. एक एक पायरी म्हणजे कार्यकर्ता असतो. तो नेत्याला जोडणारा दुवा असतो. सर्व जाती धर्माच्या लोकांचा आपण आदर करतो. सर्व सणांमध्ये सहभागी होतो. हे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे आले पाहिजे. सत्तेकरता आम्ही सत्तेत गेलो नाही. सर्व सामान्य लोकांची कामे व्हायला हवी त्याकरता निर्णय घेतला. विरोधाला विरोध करायचा, मोर्चे काढायचे, यातून प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही अजित पवार यांनी विरोधकांना केला.

स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी मी काम करत नाही किंवा सोशल मिडियावर पोस्ट करत नाही. पहाटे उठून लोकांची कामे कशी होतील असा माझा प्रयत्न असतो असेही काहींचे नाव घेता टोला अजित पवार यांनी लगावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *