Ads

--

आधी पुनर्वसन करा मग झोपड्या हटवा..

By Xtralarge News

December 23, 2023 1:36 pm

Ads

आधी पुनर्वसन करा मग झोपड्या हटवा..

 

मुंबई दि. २३ डिसेंबर-

रेल्वे रुळालगत 40 वर्षाहुन अधिक काळापासून वसलेल्या झोपडपट्या आहेत अशा झोपडपट्ट्यांचे निष्कासन तातडीने थांबवा. अधिकृत झोपडपट्टीवासीयांचे रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने अधिकृत पुर्नवसन करावे. पर्यायी घर देऊन पुर्नवसन केल्यानंतरच रेल्वे रुळालगतच्या या झोपडपट्याच्या निष्कासनचा विचार करावा अशी आग्रही मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली.

महाराष्ट्रातील रेल्वे स्टेशन्स आणि रेल्वे रुळालगत रेल्वेच्या जमिनीवर असणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन यावर चर्चा केली.

यावेळी झालेल्या चर्चत रेल्वेमंत्री यांनी रेल्वे रुळालगत असणाऱ्या झोपडपट्या बाबत सहानुभुती आहे.अनेक वर्षापासून हे रेल्वे रुळालगत राहणा-या झोपडनट्टी धारकांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निष्कासन कार्यवाही होत आहे. ती कार्यवाही थांबवण्याबाबत विचार करित आहोत. या झोपडपट्टीवासियांबद्दल सहानुभुति आहे. त्यामुळे या झोपडपटया निष्कासनाची कार्यवाही थांबवण्याचा विचार करित असल्याचे आश्वासन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले.

 

रेल्वेरुळालगत असणारी निवासस्थाने, झोपडपटट्या यांना पर्यायी घर देऊन त्यांचे पुर्नवसन करण्याबाबत आणि रेल्वेरुळाजवळ असणाऱ्या झोपडपटट्या बाबत निशकासन थांबवण्याची बैठक मुंबई सह्याद्री अतिथी गृह येथे 29 डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथी गृह, मलबार हिल मुंबई येथे रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक,मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक, म्हाडाचे अधिकारी, एम.एम.आर.डी.ऐ.चे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आणि सर्व संबंधीतांना या बैठकीत निमंत्रीत करण्यात आले आहे. सर्व संबंधीत अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे. या डमझोपडीधारकांचे पूर्नवसन करण्याबाबत विचारविनिमय होणार आहे. महाराष्ट्र शासनाचे अधिकारी सुध्दा या बैठकीला उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली आहे.

 

No comments to show.

Leave a Comment