मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली कसं सहन करायचं?

0
images (96)

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली कसं सहन करायचं?

नवी दिल्ली, दि. ९ ऑगस्ट :

मणिपूरमध्ये सरकारची अत्यंत लज्जास्पद भूमिका समोर आली आहे. लाजिरवाण्या चुका तिथल्या राज्य सरकारकडून झाल्या आहेत. महिलांसोबत जे काही घडले ते कसे घडू दिले जाते सरकार भूमिका का घेत नाही. मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली कसं सहन करायचं? त्या भारताच्या मुली नाहीत का ?असे संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी उपस्थित केले.

 

अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मणिपूरमध्ये हिंसाचारात १७९ मृत्यू, ६० हजार लोक बेघर झाले, ३५० रिलीफ कॅम्प, कॅम्पमध्ये निर्वासित ४० हजार, ३६६२ घरं जाळली. ३२१ प्रार्थनास्थळं जाळली. १६१ केंद्रीय दलं तैनात करण्यात आली. १० हजारहून जास्त दंगली, हत्या, बलात्काराची प्रकरणं घडली आहेत. आपण इतके असंवेदनशील झालो आहोत का? असा परखड प्रश्न सुप्रियाताई सुळेंनी उपस्थित केला. पण सरकार एवढे असंवेदनशील का झाले आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही अशा सरकारला पाठिंबा कसा देऊ शकता. हे सत्ताधारी आणि विरोधकांबद्दल नाहीये. हे या देशाच्या महिलांच्या सन्मानाबद्दल आहे. तिच्या चारित्र्याचे धिंडवडे काढाल का ? सरकारसमोर केवळ एकच उद्दिष्ट आहे ते म्हणते 2024 मध्ये सत्ता मिळवणे अशी टीकाही त्यांनी केली.

 

मोदी सरकारचा महत्वपूर्ण प्रकल्प असलेल्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनवरूनही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे त्या म्हणाल्या की वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनबद्दल मला काही बोलायचे नाही. ही चांगली गोष्ट आहे. मात्र गरीबांच्या ट्रेनचं काय? माझ्या मतदारसंघात तीन रेल्वे स्थानके आहेत. परंतु एकही रेल्वे थांबत नाही. यूपीएचं सरकार असताना दहा-दहा ट्रेन थांबत होत्या. त्यामुळे गरीबांच्या ट्रेनकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने वंदे भारत सुरू केले पण त्याचबरोबर गरीब रथ रेल्वेही वाढवल्या असत्या तर आम्हीही कौतुक केले असते. कारण गरीब वंदे भारतमध्ये बसत नाहीत तर गरीब रथ मध्ये बसतात. त्यात वंदे भारत अनेक ठिकाणी थांबच नाहीत तर त्याचा फायदा काय. युपीएच्या काळात रेल्वे स्थानकांवर थांबत होत्या आता फक्त रेल्वे स्थानकावरून जातात असेही असे सुप्रियाताई सुळे यांनी यावेळी म्हटले आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *