Ads

---

उद्घाटनावर बहिष्कार घालणे विरोधकांच्या वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक..

By Xtralarge News

May 24, 2023 9:00 pm

Ads

उद्घाटनावर बहिष्कार घालणे विरोधकांच्या वैफल्यग्रस्ततेचे निदर्शक..

मुंबई, दि २४ मे :

लोकशाहीचे पवित्र मंदिर म्हणून गौरविण्यात येणाऱ्या भारतीय संसदेच्या नूतनवास्तूचे स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती दिनी म्हणजेच २८ मे, २०२३ रोजी माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते उदघाटन होत आहे, ही अत्यंत अभिमानाची घटना आहे. मात्र या ऐतिहासिक समारंभावर बहिष्कार घालण्याची काही विरोधी पक्षांची कृती ही अत्यंत गैर आणि त्यांच्यातील वैफल्यग्रस्ततेची निदर्शक आहे, असे मत महाराष्ट्र विधानसभचे अध्यक्ष माननीय ॲड.राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे.

 

संसदीय कार्य प्रणालीत सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष अशा दोहोंचा सहभाग महत्वाचा मानला जातो. संसदेच्या माध्यमातून लोकहिताच्या प्रश्नांना न्याय दिला जातो, राष्ट्रीय प्रश्न सोडविले जातात, धोरण निश्चिती होते. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे संसदेच्या नूतनवास्तूचे उदघाटन होत असताना विरोधी पक्षांनी त्यावेळी बहिष्कार घालणे उचित होणार नाही. भारत हा जगातील सर्वात मोठा संसदीय लोकशाही असलेला देश म्हणून ओळखला जातो. त्या देशाच्या संसदेच्या नूतनवास्तूचे देशाच्या माननीय पंतप्रधानांच्या शुभहस्ते उदघाटन होत असताना अशाप्रकारे गालबोट लावले जाणे सर्वथा अनुचित आहे.

 

भारतातील एका राज्याच्या विधानसभेच्या नूतनवास्तूचे उदघाटन कोणत्याही संविधानिक पदाची जबाबदारी त्यावेळी ज्यांच्याकडे नव्हती अशा व्यक्तीच्या हस्ते करण्यात आलेले आहे. मात्र सर्वच पक्षीय प्रतिनिधी, नेते त्यावेळी उपस्थित होते. “देशाचे पंतप्रधान” या संविधानिक पदावरील महनीय नेत्याच्या शुभहस्ते हा ऐतिहासिक समारंभ आता होत असताना काहींच्या पोटात का दुखत आहे, असा सवालही विधानसभा अध्यक्ष माननीय ॲड.राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आहे.

 

No comments to show.

Leave a Comment