केजरीवाल मुंबईत उद्धव ठाकरे व पवारांना भेटणार..

0
images (68)

केजरीवाल मुंबईत उद्धव ठाकरे व पवारांना भेटणार..

 

मुंबई, दि. २२ मे;

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत दोन दिवसाच्या दौऱ्याकरता येणार असून सध्या महाराष्ट्रात सुरू असलेले राजकारण तसेच भाजपने इतर पक्षांची केलेली कोंडी लक्षात घेऊन बुधवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांना गुरुवारी भेटणार आहेत.

 

प्रामाणिक राज्य सरकारला सत्तेच्या चाव्या हातात मिळाल्या म्हणून केंद्र सरकार त्रास देत आहे. दिल्लीतील सत्ताधारी राज्य सरकारला काम करून न देता सतत त्रास देण्याचा कट भाजपा आणि मोदी संचालित केंद्र सरकार रचत आहे आणि त्यामुळे मोदी आणि भाजपा संचालित केंद्र सरकारला पराभूत करण्याकरिता देशातील सर्व पक्षांनी एकत्रित यायला हवे आणि या करिता दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीच्या संयोजक अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर असून महाराष्ट्रातील नेत्यांची भेट घेणार आहेत.

 

लोकशाही संपवायला निघालेल्या भाजप सरकारला लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *