मोदी सरकारच्या हुकूमशाहीचा पुन्हा पराभव…
मोदी सरकारच्या हुकूमशाहीचा पुन्हा पराभव…
मुंबई , दि. २२ मे ;
एनसीटी दिल्लीच्या निवडून आलेल्या सरकारला सेवांद्वारे नोकरशाहीवर नियंत्रण देण्याचा निकाल हा केवळ आम आदमी पक्षाचाच नाही तर प्रातिनिधिक लोकशाहीच्या आपल्या घटनात्मक आदेशावर विश्वास ठेवणाऱ्या या देशातील प्रत्येक नागरिकाचा विजय आहे. एलजीच्या माध्यमातून मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या हुकूमशाही कारवायांचा दारुण पराभव झाला आहे. असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे.
“सत्याचा विजय झाला आहे. सध्याच्या बाजपा शाशीत केंद्र सरकारने दिल्ली सरकारच्या कामकाजात अडथळा आणण्यासाठी राज्यघटनेचा विपर्यास आणि चुकीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली राज्य सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार आहे परंतु बाजपा शाशीत केंद्र सरकार दिल्लीच्या जनतेने निवडून दिलेल्या राज्य सरकारला आपल्या अधिकारांचा वापर करू देत नाही आणि ही लोकशाहीची हत्या आहे.
सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की, दिल्ली सरकारकडून सेवा काढून घेण्याच्या प्रयत्नात, कायदेशीररित्या निवडून आलेल्या सरकारला काम करू न देण्याचा प्रयत्न केला गेला आहे आणि ते राज्यघटनेचे उल्लंघन आहे आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालय ने दिल्ली राज्य सरकारचा अधिकार कायम ठेवला आहे, असे मत आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केलं.
अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष अखंड आहे. आपली राज्यघटना ही भारतात सर्वोच्च आहे आणि हुकूमशहाच्या काल्पनिक इच्छा नाही. हे ऐतिहासिक प्रकरण केंद्र सरकारला फेडरल रचनेचा आदर करण्यासाठी आणि राज्यांमधील कायदेशीररित्या निवडून आलेल्या सरकारकडून सत्ता हिसकावून न घेण्याची चेतावणी म्हणून काम करेल, असे आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास म्हणाले.
