मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवा.
मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवा.
बंगळुरू, दि. ७ मे :-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. यावेळी मणिपूरमध्ये अडकलेल्या मराठी तरुणांना सुरक्षा पुरवण्याबाबत चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्रातील 22 विद्यार्थी हे मणिपूरमध्ये अडकलेले असून त्यांना सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष विमान पाठवण्याचे निर्देश राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. या विद्यार्थ्यांना मणिपूरमधून आसामला आणण्यात येणार असून तेथून त्याना विशेष विमानाने महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याशी त्यांनी संवाद साधला.
शिवसेनेचे मणिपूर राज्यप्रमुख टोबी सिंह यांच्याशी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून संवाद साधला असून या विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर लागेल ती सर्व मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
