Ads

--

ठाकरे सरकारचे १० हजार कोटींचे पॅकेज

By Xtralarge News

October 14, 2021 12:12 pm

Ads

ठाकरे सरकारचे १० हजार कोटींचे पॅकेज

मुंबई, दि. 14 ऑक्टोबर :
राज्यात नुकतेच मराठवाडा व राज्याच्या काही भागात अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट नंतर माहिती दिली.

अतिवृष्टी व पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे .  या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत केली जाणार असून ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

झालेले नुकसान भरून न येण्यासारखे असले तरी राज्यसरकार कोणत्याही परिस्थितीत अतिवृष्टी व पूरग्रसत्तांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

No comments to show.

Leave a Comment