Ads

---

अभिनयसम्राट दिलीप कुमार यांचे निधन !

By Xtralarge News

July 7, 2021 3:19 pm

Ads

अभिनयसम्राट दिलीप कुमार यांचे निधन !

मुंबई, दि. ७ जुलै :
हिंदी चित्रटसृष्टीतील पहिले सुपरस्टार, ट्रॅजेडीकिंग सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांचे आज सकाळी ७.३० वाजता निधन झाले. हिंदूजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी वयाच्या ९८ व्या अखेरचा श्वास घेतला. दिलीपकुमार यांना प्रकृतीच्या कारणास्तव काही दिवसांपूर्वी हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.याआधी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे डिस्चार्जही देण्यात आला होता. परंतु आज त्यांनी जगाचा निरोप घेतला.
दिलीपकुमार यांनी १९४४ साली ज्वारभाटा चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले आणि पुढची पाच दशके त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या कारकिर्दीत दिलीपकुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ क्रांती, सौदागर, कर्मा, अशा अनेक चित्रपटातून महत्वाच्या भुमिका साकारल्या. ‘मुगल-ए-आजम’ मधील सलीमप्रमाणेच ‘देवदास’ मधील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो.
आपल्या पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी फक्त ६५ चित्रपटच केले. मोजके पण दर्जेदार चित्रपट करण्याकडे त्यांचा कल होता. दिलीपकुमार जसे चाहत्यांच्या गळ्यातील ताईत होते तसेच ते चित्रसृष्टीतील अनेक कलाकारांसाठी प्रेरणास्रोत ठरले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील लखलखता तारा कायमचा काळाच्या पडद्याआड गेला.
दिलीपकुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments to show.

Leave a Comment