Ads

---

ग्रामीण भागात फोफावतोय कोरोना, एकाच दिवशी १९३ रुग्ण !

By Xtralarge News

July 12, 2020 2:29 pm

Ads

सोलापूर, दि. १२ जुलै २०२०

कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये सोलापूरचा नंबर लागत असून आतापर्यंत चार हजारांपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या पोहचली आहे. तर शनिवारी एकाच दिवशी तब्बल १९३ रुग्णांची त्यात भर पडली आहे. यातही महानगरपालिका हद्दीपेक्षा ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत शहरात रुग्णसंख्या जास्त होती पण शनिवारीच्या आकड्यांनुसार जिल्हा परिषद हद्दीत तब्बल १०७ रुग्ण सापडले तर महानगरपालिका हद्दीत ८६, यात विशेष बाब म्हणजे ग्रामीण भागात कोरोना हातपाय पसरु लागला आहे. बार्शीतील कोरोना रुग्ण संख्या ५० आहे तर अक्कलकोट तालुक्यात १८, दक्षिण सोलापूर-१६ आणि  मोहोळ तालुक्यात ७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोरोनाची संख्या मुंबईसह इतर शहरात झपाट्याने वाढत होती तेव्हा सोलापूर जिल्हा हा ग्रीन झोनमध्ये होता. जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण सापडला नव्हता परंतु शहरात एकाला कोरोनाची बाधा होताच हळूहळू हे लोण पसरत गेले. त्यानंतर तो ग्रामीण भागातही पोहचला. कोरोनाची ही वाढती साखळी तोडण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा विचार होत असताना शुक्रवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर शनिवारी जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन १६ तारखेपासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनाला लगाम घालायचा असेल तर घरातच रहा, विनाकारण फिरु नका, मास्क घाला व सोशल डिस्टन्स पाळण्याची आवश्यता असल्याचे आवाहन प्रशासान वारंवार करत आहे, त्याचे पालन नागरिकांनी करावे.

 

 

No comments to show.

Leave a Comment