Ads

--

सोलापूरचे PSI राहुल बोराडे यांचे निधन !

By Xtralarge News

June 8, 2021 9:24 pm

Ads

सोलापूरचे PSI राहुल बोराडे यांचे निधन !

सोलापूर, दि. 8 जून :
सोलापूरातील पोलीस उपनिरीक्षक राहुल वैजिनाथ बोराडे यांचे कोरोनाने निधन झाले आहे. कोविडनंतर त्यांच्या फुफ्फुसातील संसर्ग वाढला होता. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

राहुल बोराडे हे काही महिन्यापुर्वीच सोलापूर पोलीस आयुक्तालयात रुजू झाले होते. ते जोडभावी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत होते. अवघ्या 36 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे.

No comments to show.

Leave a Comment