Ads

--

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन.

By Xtralarge News

May 16, 2021 11:29 am

Ads

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे निधन.

मुंबई, दि. १६ मे २०२१:
काँग्रेसचे तरुण नेते खासदार राजीव सातव यांचे कोरोनाने आज सकाळी निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर २० दिवसांपासून उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती परंतु पुन्हा त्यांची प्रकृती खालावली. वयाच्या ४६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी करण्यात आली, अहवाल आल्यानंतर त्यांना २३ एप्रिल रोजी जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालवल्यानंतर मुंबईतील तज्ञ डॉक्टरांनीही त्यांच्यावर उपचार केले होते. त्यांना सायटोमेगालो विषाणूचा संसर्ग झाला होता.
राजीव सातव यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना चेन्नई किंवा हैदराबाद येथे उपचारासाठी हलवण्याचे प्रयत्न सुरु होते परंतु त्यांना पुण्यातून हलवणे अत्यंत अवघड होते. त्यामुळे पुण्यातच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी रुग्णालयात जाऊन उपचाराची माहिती घेत होते. त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली होती पण अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

No comments to show.

Leave a Comment