Ads

---

सीबीएसईच्या अभ्यासक्रमात लोकशाहीला कात्री?

By Xtralarge News

July 9, 2020 11:40 am

Ads

मुंबई दि. ९ जुलै २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम कमी करताना सीबीएसईने  ९ ते १२ वीच्या अभ्यासक्रमातून लोकशाही, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, भारताची विविधता यांनाच कात्री लावली आहे. लोकशाहीचा गाभा असणारा अभ्यासक्रमच हटवल्याने सीबीएसच्या या कृतीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सीबीएसईच्या अभ्यासक्रमातून लोकशाहीचे धडे हटवून केंद्रातील भाजप सरकार आपला अजेंडा राबवू पहात असल्याचा आहे असा, आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

भाजपचा अजेंडा अगदी स्पष्ट आहे, त्यांना लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला दूर करायची आहे म्हणूनच तरुण पिढीला हे शिकवू न देणे हाच त्यांच्यासमोर उत्तम मार्ग आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे.

आगामी काळात भाजपा वेगळ्या मार्गाने इतिहास पुन्हा लिहून अभ्यासक्रमात जोडू शकेल अशी भीतीही प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केली आहे.

No comments to show.

Leave a Comment