Ads

--

प. बंगालमध्ये ममतांची ‘दीदीगिरी’; मोदी-शहा सपशेल फेल !

By Xtralarge News

May 2, 2021 7:31 pm

Ads

प. बंगालमध्ये ममतांची ‘दीदीगिरी’ ; मोदी-शहा सपशेल फेल !

कोलकाता, दि. 2 मे.
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने ममता बनर्जी यांचा पराभव करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सभांचा धडाका, मोदींचे अर्धे मंत्रीमंडळ, भाजपाचे मुख्यमंत्री आणि देशभरातील लाखो भाजपा कार्यकर्ते प. बंगालच्या निवडणुकीत उतरली असतानाही ममता बॅनर्जी यांनी एकहाती झुंज देत मोदींच्या बलाढ्य शक्तीला चारीमुंड्या चित केले. आणि भाजपाच्या स्वप्नांचा चुराडा केला.

292 पैकी 200 हून अधिक जागांवर दणदणीत विजय मिळवत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमुल काँग्रेसने सलग तिस-यांदा विधानसभा निवडणुक जिंकण्याची हॅटट्रीक केलेली आहे. तर भाजपाला 75 जागांवर विजय मिळवता आला. मागणी निवडणुकीत भाजपाला फक्त 3 जागांवर विजय मिळवता आला होता. तर यावेळी 75 च्या पुढे मजल मारून भाजपाने पश्चिम बंगालमध्ये भक्कम पाया रोवले आहेत. काँग्रेस व डाव्या पक्षांची पूर्ण वाताहत झाली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर ममता बॅनर्जी यांच्यावर देशभरातील मोठमोठ्या नेत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आरजेडी नेते तेजस्वी यादव, सपा नेते अखिलेश यादव, जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासहीत अनेक नेत्यांनी ममता बॅनर्जी यांना विजयाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलंय.

No comments to show.

Leave a Comment