Ads

--

‘रेमडेसीवीर’वरून मुंबईत मध्यरात्री हाय होल्टेज ड्रामा!

By Xtralarge News

April 18, 2021 11:57 am

Ads

रेमडेसीवीर वरून मुंबईत मध्यरात्री हाय होल्टेज ड्रामा!

रेमडेसीवीर कंपनीच्या मालकासाठी फडणवीस – दरेकर मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये.

मुंबई, दि. 18 एप्रिल:

रेमडेसीवीर, ऑक्सीजन, लस पुरवठा यावरून महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार यांच्यात वारंवार वाद होत असताना शनिवारी मुंबईत रेमडेसीवीर वरून हाय होल्टेज ड्रामा झाला. मुंबई पोलीसांनी रेमडेसीवीर चा साठा असलेल्या एका कंपनीच्या अधिका-याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 60 हजार रेमडेसीवीर असल्याचा संशय होता. ही माहिती मिळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , प्रविण दरेकर आणि आ. प्रसाद लाड हे मध्यरात्री पोलीस स्टेशन मध्ये अडकले. यावेळी पोलीस अधिकारी व भाजपा नेते यांच्यात शाब्दिक वाद झाला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे.

एका मंत्र्यांचा ओएसडी दुपारी फोन करून धमकी देतो आणि विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर देऊच कसे शकता, असा जाब विचारतो आणि संध्याकाळी १० पोलिस त्यांना ताब्यात घेतात, हे सारेच अनाकलनीय आहे. आज पोलिस ठाणे आणि उपायुक्त कार्यालयात जाऊन याचा जाब विचारला.

महाराष्ट्र आणि दमणच्या परवानग्या घेतल्या असताना, अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्राला द्या, असे स्वतः केंद्रीय मंत्र्यांनी या कंपनीला सांगितले असताना, इतक्या गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही, एवढेच म्हणेन, असे फडणवीस म्हणाले.

No comments to show.

Leave a Comment