Ads

--

बलात्कारी नराधमाला वाचवण्यासाठी ३५ लाखांची लाच !

By Xtralarge News

July 6, 2020 2:32 pm

Ads

अहमदाबाद, दि. ६ जुलै २०२०

बलात्काराच्या आरोपीवर कठोर शिक्षा न करण्यासाठी एका महिला PSI ने ३५ लाखांची लाच मागितल्यावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये दोन महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकावर बलात्कारची केस दाखल केली होती. हे प्रकरण २०१९ चे आहे. या प्रकरणात कठोर शिक्षा होऊ नये म्हणून तोडपाणी करण्यात आले त्यासाठी महिला PSI ने आरोपीच्या भावाकडे ३५ लाख रुपयांची मागणी केली त्यातील २० लाख रुपये एका मध्यस्थामार्फत देण्यात आले.

त्यानंतर महिला पीएसआय या १५ लाखांसाठी तगादा लावत होत्या शेवटी आरोपीने तक्रार दाखल केल्यानंतर महिला पोलीस अधिकारी यांना क्राईम ब्रँचने अटक केली, त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

No comments to show.

Leave a Comment