Ads

--

१० वी १२ चे वर्ग आता JioTV वर..आणखी ९ चॅनल्स लवकरच !

By Xtralarge News

July 6, 2020 12:48 pm

Ads

मुंबई, दि. ६ जुलै २०२०

कोरोनामुळे शाळा सुरु करण्यात अत्यंत जिकीरीचे आहे परंतु शिक्षण थांबता कामा नये या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भुमिकेनंतर ऑनलाईन शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन शाळा पद्धतीतही अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतानाच राज्याच्या शिक्षण विभागाने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे.

दहावी व बारावीचे महत्व लक्षात घेऊन दहावीचे मराठी आणि इंग्रजी माध्यम तसेच बारावीच्या विज्ञान शाखेसाठी (JioTV) जिओ टीव्हीवरील ज्ञानगंगा या तीन शैक्षणिक वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी tweet करत ही माहिती दिली आहे. ‘१० वी मराठी व इंग्रजी माध्यम, १२ वी विज्ञान शाखेसाठी जिओ टी.व्ही.वरील (JioTV) ज्ञानगंगा या ३ शैक्षणिक चॅनेलचे उद्घाटन केले आहे इतर ९ चॅनेल्सही लवकरच येणार आहेत. जिओ सावनवर महावाणी रेडीओ कार्यक्रमाचे देखील उद्घाटन केले.’

Jio Tv वरील या तीन वाहिन्यांवर दररोज सहा तास तासिका प्रक्षेपित केल्या जाणार आहेत. या तासिकांचे वेळापत्रकही लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. इतर नऊ वाहिन्यांमध्ये दहावी (उर्दू माध्यम), नववी (मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यम), आठवी, सातवी आणि सहावी (इंग्रजी, मराठी, उर्दू माध्यम) आणि तिसरी, चौथी (इंग्रजी, उर्दू, मराठी) वाहिन्या सुद्धा लवकरच सुरू होणार आहेत.

करोनामुळे शाळा बंद आहेत, मात्र ऑनलाइन पद्धतीने सुरु करण्यात आलेले शिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून या तीन शैक्षणिक वाहिन्यांचे उद्घाटन करण्यात आले आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

No comments to show.

Leave a Comment