Ads

--

राज्यात कोरोनाचा विस्फोट; आज ४३ हजार १८३ रुग्ण !

By Xtralarge News

April 1, 2021 10:05 pm

Ads

राज्यात कोरोनाचा विस्फोट; आज ४३ हजार १८३ रुग्ण !

मुंबई, दि. 1 एप्रिल :
कोरोनाची वाढती रुग्ण संख्या ही ठाकरे सरकार समोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. दररोज रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. आज दिवसभरात राज्यात ४३ हजार १८३ नवीन कोरोना रुग्ण वाढले असून २४९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२ टक्के एवढे आहे. १९ लाख ०९ हजार ४९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १८,४३२ संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन राज्य सरकार पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याची चाचपणी करत आहे. लाॅकडाऊन करू नये अशी मागणी जोर धरत आहे.
प्रशासनाकडून निर्बंध अधिकच कडक केले जात आहेत. लसीकरण मोहीम देखील सुरू आहे. तरी देखील कोरोनाचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून येत असल्याने सरकारसमोर प्रश्न निर्माण झाला आहे.

लसीकरण मोहिमेअंतर्गत आजपासून 45 वर्षांवरील सर्वांना लस देण्यास सुरुवात केली आहे. तर कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाच्या चाचण्यांचे दर कमी करून राज्य सरकारने नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे.

 

 

No comments to show.

Leave a Comment