Ads

-

सोन्याचे मंदिर, सोन्याचा शर्ट पाहिला, आता पहा चक्क २४ कॅरेट सोन्याचे हॉटेल !!

By Xtralarge News

July 5, 2020 1:52 pm

Ads

मुंबई, दि. ५ जुलै २०२०

सोन्याची आवड कोणाला नसते. सोन्याची दागिणे तर महिलांची पहिली पसंदी. आजकाल सोन्याचा शर्ट, किलो किलो सोनं अंगावर मिरवण्याचा छंदही काही पुरुषमंडळी जोपासत आहेत.कोरोनासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे यातही एका पठ्ठ्याने शक्कल लढवली आणि थेट सोन्याचा मास्कच बनवला…आपल्याकडे मंदिरामध्ये भरपुर सोने आहे. तिरुपती बालाजीच्या मंदिरातील सोने तर आपल्यापैकी अनेकांनी पाहिलेही आहे. देवाला सोन्याचा मुकुट, सोनेरी सिंहासन, सोन्याच्या पादुका हेही पाहून झाले. अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिरही आहे. पण आता चक्क सोन्याचे हॉटेल बांधण्यात आले आहे.

होय मंडळी, तुम्ही बरोबर वाचले, चक्क सोन्याचे हॉटेल तेही २४ कॅरेटचे !! हे २५ मजल्यांचे भव्य फाईव्ह स्टार हॉटेल असून त्यात ४०० खोल्या आहेत. हॉटेलच्या लॉबीमध्ये फर्निचर देखील सोन्याचेच बनवण्यात आले आहे. दारं, खिडक्या, कप, टेबल, नळ, जेवणाची भांडी ही सर्व सोन्याचेच आहे पण वॉशरूम आणि टॉलेटसुद्धा सोन्याचेचे आहे. या हॉटेलसाठी २० कोटी डॉलर्सचा खर्च आला असून हे जगातील पहिले सोन्याचे हॉटेल आहे.

हे भव्य दिव्य फाईव्हस्टार हॉटेल आहे व्हिएतनामची राजधानी हनोई येथे आणि त्याचे नाव आहे,Dolce Hanoi Golden Lake.

आता एवढं सगळं सोन्याचं आहे म्हटल्यावर हॉटेलमध्ये राहण्यासाठी पैसेही तेवढेच मोजावे लागणार नाही की ? तर मंडळी या हॉटेलमध्ये राहण्यासाठी डबल बेडरुमचे भाडे आहे ७५ हजार रुपये. तर प्रेसिंडेंशियल सुटसाठी मोजावे लागतात तब्बल ४ लाख ८५ हजार रुपये. मग काय, करायचा का बेत या सोन्याच्या हॉटेलात मुक्कामाचा ?

No comments to show.

Leave a Comment